YouTube monetisation: 15 जुलैपासून नवीन नियम लागू, AI आणि कॉपी कंटेंट क्रिएटर्संना मोठा झटका !

Spread the love

यूट्यूबवरून पैसे कमविणे आता पूर्वीसारखे सोपे राहणार नाही. कारण येत्या 15 जुलै 2025 पासून YouTube आपल्या मॉनेटायझेशन धोरणात मोठे बदल करत आहे. या नव्या धोरणांमुळे अनेक कंटेंट क्रिएटर्सना आपल्या व्हिडीओ स्वरूपात आणि कल्पकतेत बदल करावा लागेल.

YouTube आता “मास-प्रोड्युस्ड”, म्हणजे मोठ्या प्रमाणात एकसारखा किंवा कॉपी पद्धतीने तयार होणारा कंटेंट, यावर निर्बंध आणत आहे. नवीन नियमानुसार यूट्यूबवर फक्त ओरिजिनल (मूळ) आणि युनिक (नवीन) कंटेंट असलेल्या व्हिडीओंवरच पैसे मिळवता येणार आहेत. दुसऱ्या ठिकाणाहून कॉपी केलेल्या व्हिडीओंचे पुनर्प्रकाशन चालणार नाही, त्यात महत्त्वपूर्ण बदल असणे आवश्यक आहे. केवळ व्ह्यूजसाठी नाही, तर माहितीपूर्ण आणि मनोरंजनप्रधान व्हिडीओंनाच आता प्राधान्य दिले जाणार आहे. AI (Artificial Intelligence) वापरून तयार केलेल्या आवाज व व्हिडीओंवरही YouTube लक्ष ठेवणार आहे.

अलीकडे अनेक यूट्यूब चॅनल्सवर AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केलेले व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. उदाहरणार्थ, कोणीतरी AI generated आवाज वापरून दुसऱ्याच्या व्हिडीओंवर प्रतिक्रिया देतो, अशा प्रकारच्या कंटेंटवर यापुढे YouTube अधिक कठोर कारवाई करू शकतो. AI व्हिडीओंवर लागू होणाऱ्या नियमांची स्पष्टता लवकरच देण्यात येणार आहे.

2020-21 मध्ये YouTube ने ‘Shorts’ हे रील्ससारखे शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर आणले. यामुळे अनेक क्रिएटर्सनी टिकटॉकसारख्या स्टाईलने एकसारखे, रिपीट होणारे व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. त्यामुळे YouTube आता आपले वेगळेपण टिकवण्यासाठी अशा कंटेंटवर निर्बंध आणत आहेत.

YouTube ने आपल्या अधिकृत सपोर्ट पेजवर स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांचा उद्देश क्रिएटर्सकडून ओरिजिनल आणि प्रामाणिक कंटेंट तयार करून घेणे आहे. त्यामुळे, जे क्रिएटर्स स्वतःची कल्पकता, संशोधन आणि गुणवत्ता वापरून व्हिडीओ तयार करतात, त्यांच्यासाठी ही संधी अधिक मोलाची ठरेल. लवकरच लागू होणाऱ्या या बदलांसाठी प्रत्येक यूट्यूबरने आपले कंटेंट धोरण पुनर्विचार करणे आवश्यक आहे. तुमचा कंटेंट ओरिजिनल आहे का? तुम्ही तयार आहात का या नव्या युगासाठी?याचा विचार नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *