Special Ops 2 trailer : स्पेशल ऑप्स सिरीचा नवा भाग येणार भेटीला, हिम्मत सिंहची आता सायबर दहशतवादाविरुद्ध लढाई !

Spread the love

बॉलीवूड अभिनेता के के मेनन याच्या ‘स्पेशल ऑप्स’ या सुपरहिट वेब सीरिजने 2020 मध्ये प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. आता, तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्पेशल ऑप्स 2 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे. ही सीरिज 11 जुलै रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

स्पेशल ऑप्स 2च्या ट्रेलरने प्रेक्षकांना पुन्हा एकदा हिम्मत सिंहच्या थरारक विश्वात घेऊन जाण्याची तयारी केली आहे. या सीरिजमध्ये हिम्मत सिंहच्या पुढील कथानकावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. ट्रेलरमध्ये सायबर दहशतवादाचा सामना करताना हिम्मत सिंहच्या नव्या मिशनची झलक दिसते. ट्रेलरची सुरुवातच इतकी दमदार आहे, की प्रेक्षकांना पहिल्या सीजनच्या रोमांचकारी आठवणी ताज्या होतात. के के मेनन याने पुन्हा एकदा हिम्मत सिंहच्या भूमिकेत शिरून दमदार अभिनय साकारला आहे. त्यांच्यासोबत प्रकश राज, करण टक्कर, विनय पाठक आणि आफताब शिवदासानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील, ज्यामुळे ही सीरिज आणखी रंजक होणार आहे.

ट्रेलरमध्ये हाय-टेक सायबर क्राइम, तणावपूर्ण दृश्ये आणि हिम्मत सिंहच्या बुद्धिमत्तेचा वापर करून गुन्हेगारांना चकवण्याच्या रणनीती दाखवण्यात आल्या आहेत. पहिल्या सीजनने भारतीय वेब सीरिजच्या निर्मिती डिझाइनमध्ये एक नवीन मापदंड प्रस्थापित केला होता. त्यामुळे दुसऱ्या सीजनकडूनही तशीच अपेक्षा आहे. सायबर दहशतवादासारख्या समकालीन विषयाला हाताळताना ही सीरिज थ्रिल, ॲक़्शन आणि इमोशन यांचा संगम घेऊन चाहत्यांचे मनोरंजन करेल यात शंका नाही. चाहत्यांनी या सीरिजच्या ट्रेलरला ‘पहिल्या सीजनपेक्षा 10 पटीने खतरनाक’ असल्याचं वर्णन केलं आहे, ज्यामुळे अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *