साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. साहित्य अकादमीच्या वतीनं यंदा 24 भाषांसाठीचे ‘बाल साहित्य पुरस्कार’ आणि 23 भाषांसाठीचे ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आले. यंदा दोन मराठी साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळवले आहेत. कवी सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार तर लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळी डोळे’ या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांबद्दल महाराष्ट्रभरातून दोन्ही साहित्यिकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.