मुंबई : नाटक, चित्रपट, मालिका आणि विविध कार्यक्रमांमध्ये यश मिळवण्यासाठी केवळ कलात्मकता नव्हे, तर काटेकोर व्यवस्थापनही तितकंच महत्वाचं असतं. यासाठी ‘PIN to CARPET’ ही संज्ञा वापरली जाते – म्हणजेच छोट्यातल्या छोट्या गोष्टींपासून ते अंतिम अंमलबजावणीपर्यंत सर्व काही बारकाईने हाताळणे.
या विषयावर एक आगळीवेगळी पण अत्यंत उपयुक्त अशी व्यवस्थापन कार्यशाळा येत्या रविवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिर संकुल (C हॉल) येथे होणार आहे.
कार्यक्रमात नाट्य, चित्रपट, मालिका आणि इव्हेंट्स क्षेत्रात अनेक वर्षे यशस्वीपणे काम करणाऱ्या नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन सहभागींसाठी उपलब्ध होणार आहे. आज वाढदिवस, लग्नसमारंभ, बारसे, मुंज यांसारख्या छोट्या कार्यक्रमांपासून ते मोठमोठ्या इव्हेंट्सपर्यंत इव्हेंट मॅनेजमेंटची मागणी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, नवोदितांना योग्य दिशा देण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
अवघ्या ₹७५० प्रवेश शुल्कात (जेवण, चहा व स्टेशनरीसह) ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. प्रवेशासाठी नोंदणी सुरु असून, अधिक माहितीसाठी ९१५२३०५३१२ या क्रमांकावर संपर्क साधावा.