‘PIN to CARPET’ संकल्पनेवर आगळीवेगळी व्यवस्थापन कार्यशाळा – नाटक, चित्रपट, इव्हेंट क्षेत्रातील इच्छुकांसाठी सुवर्णसंधी

मुंबई : नाटक, चित्रपट, मालिका आणि विविध कार्यक्रमांमध्ये यश मिळवण्यासाठी केवळ कलात्मकता नव्हे, तर काटेकोर व्यवस्थापनही तितकंच महत्वाचं असतं. यासाठी ‘PIN to CARPET’ ही संज्ञा वापरली जाते – म्हणजेच छोट्यातल्या छोट्या गोष्टींपासून ते अंतिम अंमलबजावणीपर्यंत सर्व काही बारकाईने हाताळणे. या विषयावर एक आगळीवेगळी पण अत्यंत उपयुक्त अशी व्यवस्थापन कार्यशाळा येत्या रविवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी…

“स्वतःचा आवाज – व्यक्तिमत्व घडवण्याचा मूलाधार” : सावंतवाडीत २७ जुलै रोजी श्रीनिवास नार्वेकर यांचे मुलांसाठी विनामूल्य व्याख्यान

सावंतवाडी – व्यक्तिमत्त्व घडवण्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला आवाज आणि देहबोली. अभिनयामध्येदेखील या बाबी फार महत्वाच्या असतात. याच विषयावर मूळ सावंतवाडीचे व सध्या मुंबईस्थित प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक-रंगकर्मी व आवाजतज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांचे ८ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य व्याख्यान बालरंग संस्थेच्या वतीने व मुक्ताई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुलैला सकाळी ९.३० ते दुपारी २…

18 आणि 19 जुलैला ‘गझलांचा खजाना” महोत्सव सजणार !

दिवंगत गझल सम्राट पद्मश्री पंकज उधास यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘खजाना-फेस्टिव्हल ऑफ गझल्स २०२५’ १८ आणि १९ जुलैला नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये साजरा होणार आहे. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए) व पेरेंट्स असोसिएशन थैलेसेमिक युनिट ट्रस्ट (पीएटीयुटी) यांच्या सहकार्याने होणाऱ्या या महोत्सवातून थॅलेसेमिया व कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी निधी संकलित केला जाणार आहे. नरिमन पॉइंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये…

The Folk आख्यान एका मिनिटात का हाऊसफुल्ल होतंय ?

आज आपल्या महाराष्ट्रात एक कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतोय — तो म्हणजे ‘The Folk आख्यान’!लोककथा, वीरगाथा, संतकथा, पुराणकथन — या सगळ्याला थेट रंगमंचीय आणि सांगीतिक सादरीकरणाची जोड देणारा हा अनोखा प्रयोग आहे. ‘Folk आख्यान’ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर तो आपल्या मातीतल्या शूर इतिहासाला, लोककथांना, ग्रामीण मातीच्या सुगंधाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर मार्ग आहे.कोणत्याही…

‘आम्ही कोकणकर’तर्फे कोकण सन्मान सोहळा २०२५ – कोकणच्या कर्तृत्वाला सलाम!

मुंबईसारख्या मायानगरीत गेली दहा वर्षे ‘आम्ही कोकणकर संघटना’ कोकणच्या रंगभूमी, नमन, बहुरंगी लोककला, मराठी नाटक, शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज यांच्या माध्यमातून कोकणचा सांस्कृतिक ठेवा जपत आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ, पारंपरिक कलेला नवे पैलू आणि सामाजिक प्रबोधन हेच संघटनेचे मुख्य ध्येय!याच उपक्रमाचा भाग म्हणून ‘कोकण सन्मान सोहळा २०२५’ रविवार, १३ जुलै रोजी सायं. ७.१५ वा. छत्रपती…

दिविजा वृद्धाश्रमात अवतरले अवघे पंढरपूर : आजी आजोबा झाले विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील असलदे गावातील दिविजा वृद्धाश्रमात आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति पंढरपूर दिविजा वृद्धाश्रमात साकार केले. आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आजी आजोबांनी वारकारी वेशभूषा परिधान केली. यावेळी आजी आजोबांनी विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानदेव, सोपान, निवृत्तीनाथ व मुक्ताई यांचा पेहराव केला तर इतर आजी आजोबांनी वारकरी पेहराव घातल्यामुळे आश्रमातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. रविवारी दिवसभर…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घोणे काष्ठशिल्प म्युझियम आणि हॉटेल ‘आजीची आठवण’चा भव्य शुभारंभ   ; ग्लोबल कोकणच्या आर्ट व्हिलेजची ऐतिहासिक सुरुवात

कोकणातील कला, संस्कृती आणि पर्यटनाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरलेल्या ‘ग्लोबल कोकण आर्ट व्हिलेज’च्या उपक्रमाची आणि ‘घोणे काष्ठशिल्प म्युझियम’ व ‘हॉटेल आजीची आठवण’ या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांची भव्य सुरुवात आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात आलेले उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या नव्या केंद्राला पहिल्याच दिवशी भेट देऊन या…

‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 ‘खजिन्याची शोधयात्रा‘ या पुस्तकाच्या लेखनासाठी प्रशांत पोळ यांनी व्यापक संशोधन आणि अभ्यास केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृती मांडण्यात आली असल्याने शासनाच्या माध्यमातून हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाचा मोठा खजिना जनतेपर्यंत जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रशांत पोळ लिखित ‘खजिन्याची शोधयात्रा‘ या पुस्तकाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित प्रकाशन कार्यक्रमात ते…