गणेशोत्सव: महाराष्ट्राचा राज्य महोत्सव – एक सांस्कृतिक गौरव

गणेशोत्सव.. मराठी मनाची खरी ओळख.. आराध्य दैवत असणाऱ्या श्रीगणेशाचा सोहळा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आनंद सोहळा असतो.. पुण्या मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा निनाद ढोल ताशांच्या गजरात आसमंताला भिडतो.. आणि अवघ्या महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या शहरांना हाच गणेशोत्सव महानगरांच्या जल्लोषाचा दिमाख चढवतो.. आगमनसोहळ्यापासून ते विसर्जन सोहळ्यापर्यंतचा हा उत्सव मराठी सणांसोबत मराठीमनाची वीण घट्ट जोडतो आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि…

YouTube monetisation: 15 जुलैपासून नवीन नियम लागू, AI आणि कॉपी कंटेंट क्रिएटर्संना मोठा झटका !

यूट्यूबवरून पैसे कमविणे आता पूर्वीसारखे सोपे राहणार नाही. कारण येत्या 15 जुलै 2025 पासून YouTube आपल्या मॉनेटायझेशन धोरणात मोठे बदल करत आहे. या नव्या धोरणांमुळे अनेक कंटेंट क्रिएटर्सना आपल्या व्हिडीओ स्वरूपात आणि कल्पकतेत बदल करावा लागेल. YouTube आता “मास-प्रोड्युस्ड”, म्हणजे मोठ्या प्रमाणात एकसारखा किंवा कॉपी पद्धतीने तयार होणारा कंटेंट, यावर निर्बंध आणत आहे. नवीन नियमानुसार…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी देखील आहे. आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वशंज नसलो, तरीही विचारांच्या वारश्याचे वाहक आहोत. या सर्वांनी आपल्या ज्ञानाने, त्यागाने आणि धैर्याने हे राज्य घडविले. त्याला जपणे, वाढवणे आणि पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रधर्म म्हणजे स्मरण रंजन नाही. तो…

आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळाचे ५ हजार २०० विशेष बसेसचे नियोजन

आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात…

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन” म्हणून साजरा होणार

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या निर्णयाचा अध्यादेश सरकारने निर्गमित केला आहे. यापूर्वीच देशी गायीस “राज्यमाता–गोमाता” म्हणून घोषित करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे….