लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार: नितीन गडकरींचा सन्मान आणि मराठी अस्मितेचा गौरव

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात लोकमान्य टिळक यांच्या १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून गडकरी यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा…

‘आम्ही कोकणकर’तर्फे कोकण सन्मान सोहळा २०२५ – कोकणच्या कर्तृत्वाला सलाम!

मुंबईसारख्या मायानगरीत गेली दहा वर्षे ‘आम्ही कोकणकर संघटना’ कोकणच्या रंगभूमी, नमन, बहुरंगी लोककला, मराठी नाटक, शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज यांच्या माध्यमातून कोकणचा सांस्कृतिक ठेवा जपत आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ, पारंपरिक कलेला नवे पैलू आणि सामाजिक प्रबोधन हेच संघटनेचे मुख्य ध्येय!याच उपक्रमाचा भाग म्हणून ‘कोकण सन्मान सोहळा २०२५’ रविवार, १३ जुलै रोजी सायं. ७.१५ वा. छत्रपती…

प्रा. हरिभाऊ भिसे यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध कलावंत व शाहीर प्रा.हरिभाऊ भिसे यांना कोल्हापूर येथील मानवतावादी सांस्कृतिक चळवळ व दीक्षा फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. प्रा. हरिभाऊ भिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात…

लेखक प्रदीप कोकरे, कवी सुरेश सावंत यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. साहित्य अकादमीच्या वतीनं यंदा 24 भाषांसाठीचे ‘बाल साहित्य पुरस्कार’ आणि 23 भाषांसाठीचे ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आले. यंदा दोन मराठी साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळवले आहेत. कवी सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार तर लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळी…

मसुरे सुपुत्र अर्थसंकेतचे डॉ. अमित बागवे यांना ‘बिझनेस आयकॉन’ सन्मान पुरस्कार

‘अर्थसंकेत’ या मराठीतील पहिल्या व्यवसाय व अर्थविषयक वर्तमानपत्राचे संस्थापक आणि संपादक  मसुरे गावचे सुपुत्र डॉ. अमित बागवे यांना ‘बिझनेस आयकॉन मॅगझीन’तर्फे ‘बिझनेस आयकॉन’ हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे. ‘मराठी पाऊल पडते पुढे २०२५’ या कार्यक्रमात त्यांच्या आर्थिक साक्षरता, उद्योजकता आणि डिजिटल माध्यमांमधील नवप्रवर्तन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात येऊन पुरस्कारा प्रदान करण्यात…

मुक्तपीठने पाडला अनोखा पायंडा, माध्यम जगतातील बातमी जगणाऱ्यांचा केला सन्मान

आज मराठी माध्यम जगतात दरदिवशी नवनवी बातम्यांची, शब्दांची आणि तंत्रज्ञानाची क्रांती होत असताना माध्यमजगतातील तरुण माध्यमकर्मीनी जपलेली विश्वासार्हता ही प्रेरणादायी आहे. मराठी माध्यमात वृत्तनिवेदक आणि वृत्तनिर्माते यांचे पुरस्कार सोहळे असताना वृततंत्रज्ञाचा सन्मान करत मुक्तपीठ समुहाने खऱ्या अर्थाने पत्रकारितेचा सन्मान केला आहे. मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे यांच्या २०२४ भाजपा जिंकली कशी या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित…