“माझी माती, माझा बाप्पा” – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास कार्यशाळा

मुंबई | गणेशोत्सव हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आत्मा मानले जाते. अलीकडेच या लोकप्रिय सणाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून गौरवण्यात आले असून, पर्यावरणपूरकतेचा संदेश देत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. अशाच उपक्रमांमध्ये एक सर्जनशील भर घालत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तर्फे “माझी माती, माझा बाप्पा” ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही…

गणेशोत्सव: महाराष्ट्राचा राज्य महोत्सव – एक सांस्कृतिक गौरव

गणेशोत्सव.. मराठी मनाची खरी ओळख.. आराध्य दैवत असणाऱ्या श्रीगणेशाचा सोहळा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आनंद सोहळा असतो.. पुण्या मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा निनाद ढोल ताशांच्या गजरात आसमंताला भिडतो.. आणि अवघ्या महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या शहरांना हाच गणेशोत्सव महानगरांच्या जल्लोषाचा दिमाख चढवतो.. आगमनसोहळ्यापासून ते विसर्जन सोहळ्यापर्यंतचा हा उत्सव मराठी सणांसोबत मराठीमनाची वीण घट्ट जोडतो आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि…

The Folk आख्यान एका मिनिटात का हाऊसफुल्ल होतंय ?

आज आपल्या महाराष्ट्रात एक कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतोय — तो म्हणजे ‘The Folk आख्यान’!लोककथा, वीरगाथा, संतकथा, पुराणकथन — या सगळ्याला थेट रंगमंचीय आणि सांगीतिक सादरीकरणाची जोड देणारा हा अनोखा प्रयोग आहे. ‘Folk आख्यान’ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर तो आपल्या मातीतल्या शूर इतिहासाला, लोककथांना, ग्रामीण मातीच्या सुगंधाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर मार्ग आहे.कोणत्याही…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी देखील आहे. आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वशंज नसलो, तरीही विचारांच्या वारश्याचे वाहक आहोत. या सर्वांनी आपल्या ज्ञानाने, त्यागाने आणि धैर्याने हे राज्य घडविले. त्याला जपणे, वाढवणे आणि पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रधर्म म्हणजे स्मरण रंजन नाही. तो…

तुळशीदास भोईटे यांच्या ‘2024 – भाजपा जिंकली कशी’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात रंगली राजकीय संवादाची चर्चा

‘२०२४ भाजपा जिंकली! कशी?’ पुस्तकाच्या मंचावर सत्ताधारी-विरोधकांची राजकीय जुगलबंदी! तुळशीदास भोईटेंच्या विश्लेषणाचं सर्वपक्षीय कौतुक!! महाराष्ट्र विधानसभेच्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालाची ‘२०२४ भाजपा जिंकली! कशी?’ या पत्रकार तुळशीदास भोईटे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि मुक्तपीठ सन्मान कार्यक्रम शुक्रवारी मुंबईत संपन्न झाला. हा कार्यक्रम म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांच्या वैचारिक जुगलबंदीचा विचारमंच ठरला. कार्यक्रमाचे अध्यक्ष एबीपी…

राजकोट किल्ल्यावर भव्य आरमार संग्रहालयासह प्रदर्शन, पर्यटन केंद्र उभारणार 

‘भारतीय नौदलाचे जनक’ छत्रपती शिवाजी महाराज यांचे धैर्य, शौर्य, पराक्रम, अलौकिक कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशातले पहिले आरमार स्थापन करुन दाखवलेली दूरदृष्टी सर्वांना कळावी. त्यातून प्रेरणा घेऊन भावी पिढी नौदल, नौवहनसेवेत यावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ८३ फुट उंचीचा भव्य पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला…

‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. उद्या 9 जून 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ही रेल्वे रवाना होणार आहे. IRCTC, रेल्वे मंत्रालय, आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणाऱ्या या विशेष पाच दिवसांच्या…

ज्येष्ठ समाजसेवक विजय कडणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

जेष्ठ समाजसेवक विजय कडणे यांना यंदाचा ‘बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. दरम्यान, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवार, ५ जून रोजी त्यांना पत्र लिहित त्यांचे अभिनंदन केले आहे. “सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सामाजिक न्याय विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण…

ज्येष्ठ समाजसेवक विजय कडणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार' जाहीर

राज्यभरातील ‘आयटीआय’ संस्थांमध्ये शिवराज्याभिषेक दिनी राष्ट्रहितावर व्याख्यानमालेद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत राज्यभरातील १०९७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) ‘पंचपरिवर्तन‘ संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेची सुरुवात झाली. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, इतिहासाची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाचे मूल्य रुजवणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी…

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे आज शुक्रवार दिनांक ६ जून रोजी संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने आपल्या राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे. रामायण, महाभारताचे व्यासंगी, संतवाङ्मयाचे अभ्यासक, असलेल्या दाजींनी ५० वर्षाहून अधिक काळ आपल्या व्याख्याने आणि साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले….