18 आणि 19 जुलैला ‘गझलांचा खजाना” महोत्सव सजणार !

दिवंगत गझल सम्राट पद्मश्री पंकज उधास यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘खजाना-फेस्टिव्हल ऑफ गझल्स २०२५’ १८ आणि १९ जुलैला नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये साजरा होणार आहे. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए) व पेरेंट्स असोसिएशन थैलेसेमिक युनिट ट्रस्ट (पीएटीयुटी) यांच्या सहकार्याने होणाऱ्या या महोत्सवातून थॅलेसेमिया व कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी निधी संकलित केला जाणार आहे. नरिमन पॉइंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये…

गोव्यात राजभाषा मराठीसाठी एकवटले मराठीजन 

मराठी राजभाषा करण्यासाठी पुढे सरसावलेल्या मराठी राजभाषा निर्धार समितीने राजभाषा मेळाव्याची घोषणा केली आहे. अभिजात मराठी गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे, यासाठी राज्यभर 12 प्रखंड मेळावे आयोजित केले आहेत. मराठी राजभाषा निर्धार समितीचे अध्यक्ष प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी या मेळाव्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. प्रखंड मेळाव्यात 7 जून डिचोली, 8 जून रोजी तिसवाडी तालुक्यात मेळावा आयोजित…

‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 ‘खजिन्याची शोधयात्रा‘ या पुस्तकाच्या लेखनासाठी प्रशांत पोळ यांनी व्यापक संशोधन आणि अभ्यास केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृती मांडण्यात आली असल्याने शासनाच्या माध्यमातून हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाचा मोठा खजिना जनतेपर्यंत जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रशांत पोळ लिखित ‘खजिन्याची शोधयात्रा‘ या पुस्तकाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित प्रकाशन कार्यक्रमात ते…