“स्वतःचा आवाज – व्यक्तिमत्व घडवण्याचा मूलाधार” : सावंतवाडीत २७ जुलै रोजी श्रीनिवास नार्वेकर यांचे मुलांसाठी विनामूल्य व्याख्यान

सावंतवाडी – व्यक्तिमत्त्व घडवण्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला आवाज आणि देहबोली. अभिनयामध्येदेखील या बाबी फार महत्वाच्या असतात. याच विषयावर मूळ सावंतवाडीचे व सध्या मुंबईस्थित प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक-रंगकर्मी व आवाजतज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांचे ८ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य व्याख्यान बालरंग संस्थेच्या वतीने व मुक्ताई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुलैला सकाळी ९.३० ते दुपारी २…

26 जुलै रोजी कुडाळमध्ये शिवचरित्र आणि दुर्गसंवर्धनावर मार्गदर्शन, प्रदर्शन आणि व्याख्यानांचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ११ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून शिवप्रेमींनी ‘शिव अभिमान सोहळा’ आयोजित केला आहे. येत्या शुक्रवार, दिनांक २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथील शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या सभागृहात हा विशेष कार्यक्रम पार पडणार असून, यात विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्र, दुर्गसंवर्धन, एमओडीपीआय मार्गदर्शन व प्रदर्शन आयोजित करण्यात…

अणाव रामेश्वर मंदिर येथे ‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसविण्याच काम सुरु. 

कुडाळ तालुक्यातील अणाव रामेश्वर मंदिर हे क वर्ग पर्यटन असून हे धार्मिक पर्यटन स्थळ पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे यासाठी अणाव देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार निलेश राणे यांनी पहिल्या टप्यात पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून रामेश्वर मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक…