गणेशोत्सव: महाराष्ट्राचा राज्य महोत्सव – एक सांस्कृतिक गौरव

गणेशोत्सव.. मराठी मनाची खरी ओळख.. आराध्य दैवत असणाऱ्या श्रीगणेशाचा सोहळा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आनंद सोहळा असतो.. पुण्या मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा निनाद ढोल ताशांच्या गजरात आसमंताला भिडतो.. आणि अवघ्या महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या शहरांना हाच गणेशोत्सव महानगरांच्या जल्लोषाचा दिमाख चढवतो.. आगमनसोहळ्यापासून ते विसर्जन सोहळ्यापर्यंतचा हा उत्सव मराठी सणांसोबत मराठीमनाची वीण घट्ट जोडतो आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि…

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलास दामु उगले, सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर…

आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळाचे ५ हजार २०० विशेष बसेसचे नियोजन

आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात…

श्री क्षेत्र टेरव येथे भवानी मातेचा गोंधळ शुक्रवार १३ जून, २०२५ रोजी संपन्न होणार

!श्री क्षेत्र टेरव येथे कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा मंगलमय गोंधळ सोहळा रूढी परंपरेनुसार शुक्रवार दिनांक १३ जून, २०२५ रोजी मृग नक्षत्रात जल्लोषात व आनंदान संपन्न होणार आहे. भवानी माता ही महाराष्ट्राचे व कदम कुळांचे कुलदैवत असून ही देवता सुख, समृद्धी, सौभाग्य व स्वास्थ देणारी असून दुःखाचा नाश करणारी तसेच इच्छापूर्ती करणारी देवता आहे. श्री क्षेत्र…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे दर्शन; मुक्ताईनगर येथे केले पालखीचे सारथ्य

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा शुभारंभ करत त्यांनी पालखीचे पूजन केले आणि स्वतः पालखीचे सारथ्य करून या ऐतिहासिक अध्यात्मिक परंपरेत सहभाग घेतला. पालखीचे सारथ्य केल्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “वारकरी परंपरा ही आपल्या महाराष्ट्राची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक…

बकरी ईद निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ६ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ईद अल – अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद मुबारक! ईद  अल – अधा (बकरी ईद) हा सण त्याग, करुणा व परोपकाराचा संदेश देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, सौहार्द व समृद्धी घेऊन येवो या मंगल कामनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद अल अधाच्या शुभेच्छा देतो, असे…

अयोध्येत ‘राम दरबार’ची प्राणप्रतिष्ठा

अयोध्येतील श्रीराम मंदिरात गुरुवारी ‘राम दरबार’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गर्भगृहावरील पहिल्या माळ्यावर राम दरबारची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.या वेळी राम दरबार आणि आठ विग्रहांची प्राणप्रतिष्ठा यानिमित्त उत्तर प्रदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा सोहळा ‘गंगा दशहरा’ या तिथीला करण्यात आला. हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हिंदू…

वाडी रत्नागिरी डोंगर परिसरात साकारणार ‘दख्खन केदारण्य’

महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर विकास आराखड्याची सुरुवात वृक्षारोपणाने होत असून विकास आराखडा अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथे राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा प्रशासन यांच्या…