cultural360.online

बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचे राज्य शासनामार्फतच आयोजन

सन 2025-26 या वर्षासाठीची बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य या दोन्ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मार्फतच आयोजित करण्यात येणार आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये कोणत्याही शासन बाह्य संस्थांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप नाही. ही शासन आयोजित स्पर्धा असल्याने संचालनालय त्याचे आयोजन करत आहे. या स्पर्धा आयोजनाची संपूर्ण जबाबदारी कोणत्याही एका संस्थेस देण्यात आलेली नाही. स्थानिक आयोजनातील…

वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचे निधन. मालवणी बोलीला भरजरी साज चढवणारा आपला माणूस गेला !

‘ मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख देणारे, प्रादेशिक नाट्यसंस्कृतीचे निष्ठावंत वाहक आणि ‘वस्त्रहरण’ या नाटकाचे लेखक जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावत होती. दहिसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज…

रत्नागिरीची राधिका भिडे गाजवतेय आयपॉपस्टारचा मंच, अल्पावधीतच ‘मन धावतयाची’ देशभरात जादू

देशभराच्या पॉप जगतात सध्या रत्नागिरीच्या राधिका भिडे या नव्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तिच्या ‘मन धावतंया तुझ्याच मागं… या गाण्याने ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. राधिका भिडे हिच्या गोड आवाजाने आणि मोहक व्यक्तिमत्त्वाने ती रसिकांच्या हृदयात घर करून बसली आहे. ‘आय पॉपस्टार’ या संगीत रिएलिटी शोमधून ती प्रकाशझोतात आली असून तिच्या एका गाण्याने…

शब्दाचा जादूगार – गुलजार

“तेरा इंतज़ार है, दिल में बहार है…”ज्या शब्दांनी भारतीय सिनेसृष्टीला भावना दिल्या, स्वप्नांना रंग दिले आणि हृदयाला उमाळे दिले – त्या शब्दांच्या जादूगाराचा आज वाढदिवस! गुलज़ार… नाव घ्यावं आणि “तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा तो नहीं…” ही ओळ आपोआप मनात घुमू लागते. कधी “मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है…”, तर कधी “दिल ढूँढता…

‘PIN to CARPET’ संकल्पनेवर आगळीवेगळी व्यवस्थापन कार्यशाळा – नाटक, चित्रपट, इव्हेंट क्षेत्रातील इच्छुकांसाठी सुवर्णसंधी

मुंबई : नाटक, चित्रपट, मालिका आणि विविध कार्यक्रमांमध्ये यश मिळवण्यासाठी केवळ कलात्मकता नव्हे, तर काटेकोर व्यवस्थापनही तितकंच महत्वाचं असतं. यासाठी ‘PIN to CARPET’ ही संज्ञा वापरली जाते – म्हणजेच छोट्यातल्या छोट्या गोष्टींपासून ते अंतिम अंमलबजावणीपर्यंत सर्व काही बारकाईने हाताळणे. या विषयावर एक आगळीवेगळी पण अत्यंत उपयुक्त अशी व्यवस्थापन कार्यशाळा येत्या रविवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी…

मालवणच्या सौ. राखी अरदकर यांची राष्ट्रीय स्तरावरील “कला-पुष्कर-राज रंगरेखा” विशेष चित्रकला शिबिरासाठी निवड

अ.शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण येथील कला शिक्षिका सौ. राखी हुन्नरे उर्फ राखी देवदत्त अरदकर यांची राष्ट्रीय स्तरावर आयोजित “कला-पुष्कर-राज रंगरेखा” विशेष चित्रकला शिबिरासाठी सन्माननीय निवड झाली आहे. राज्यभरातून चित्रकलेच्या क्षेत्रात वेगळे, नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या चित्रकारांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सौ. अरदकर यांची निवड हा मालवण व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या…

शिवकालीन परंपरेला उजाळा; मालवण बंदरावर नारळी पौर्णिमेचे सोहळे उत्साहात

मालवणच्या शिवकालीन नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आज मालवण जेटीवर नारळ लढविणे स्पर्धाचा थरार आज मालवणसह जिल्हाभरातील नागरिकांनी याची देही याची डोळा अनुभवला एक… दोन नव्हे तर तब्बल पाच नारळ लढविण्याच्या स्पर्धानी सारी बंदरजेटी दणाणून सोडली नारळ लढविण्याच्या स्पर्धांची रंगत नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त यावर्षीही मालवण बंदर जेटीवर विविध आयोजकांच्या वतीने नारळ लढविण्याच्या स्पर्धा रंगल्या. यामध्ये सौ. शिल्पा…

मालवणात नारळी पौर्णिमेचा जल्लोष; समुद्राला श्रीफळ अर्पण करून भरभराटीची प्रार्थना

शिवकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवणात नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मालवण व्यापारी संघाने दर्याला श्रीफळ अर्पण केले यावेळी आमदार निलेश राणे यांनीही समुद्राचे पूजन करत मच्छिमार, व्यापारी आणि नागरिक यांच्या सोबत श्रीफळ अर्पण केले.मच्छिमारांची, व्यापाऱ्यांची, तमाम नागरिकांची भरभराट होऊदेत असे साकडे यावेळी सागराला घालण्यात आले. मालवण बंदरजेटी येथे शहरातील मालवण व्यापारी…

साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मालवणात १७ रोजी चर्चासत्राचे आयोजन

कोकणातील ज्येष्ठ लेखक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत त्यांच्या जीवन व कार्याला उजाळा देण्यासाठी येथील बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण व साहित्य अकादमी दिल्ली यांच्यावतीने दि. १७ ऑगस्ट रोजी सेवांगण, मालवण येथे जयवंत दळवींच्या समग्र साहित्याची चर्चा करणारे एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी पत्रकार…

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे महान साहित्यकार प्रेमचंद जयंती साजरी

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिंदी विभागामार्फत हिंदी साहित्यातील महान साहित्यकार, कादंबरीकार कथाकार मुंशी प्रेमचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. कैलास राबते, हिंदी विभाग प्रमुख डॉ. हंबीरराव चौगले, डॉ. देविदास हरगिले, डॉ. सुमेधा नाईक, प्रा.अन्वेषा कदम व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अन्वेषा कदम यांनी केले….