cultural360.online

सुरेश ठाकूर यांना केंद्रीय ‘बालसेवा पुरस्कार’ जाहीर, बेळगाव येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा

मालवण, दि. प्रतिनिधी –आचरे (ता. मालवण) येथील सानेगुरूजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकूर (गुरूजी) यांना अखिल भारतीय सानेगुरूजी कथामालेचा मानाचा केंद्रीय ‘बालसेवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूर येथे पार पडलेल्या निवड समितीच्या बैठकीत एकमताने ठाकूर गुरूजी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अखिल भारतीय सानेगुरूजी केंद्रीय समितीचे अध्यक्ष मा. हसन देसाई (कोल्हापूर) व सचिव…

भरतनाट्यम आणि मराठी भक्तिगीतांचा अद्वितीय संगम; ‘भक्तीरंग’ हा पारंपरिक नृत्याविष्कार आज मालवणमध्ये

मालवण : भारतीय सांस्कृतिक परंपरेतील सर्वात नाजूक, अभिजात आणि भक्तीमय असा भरतनाट्यम आणि त्यासोबत मराठी भक्तिगीतांचा दिव्य संगम—हा अद्वितीय अनुभव देणारा ‘भक्तीरंग’ हा नृत्याविष्कार आज सायंकाळी भरड, मालवण येथील श्री दत्त मंदिरात रसिकांसमोर सादर केला जाणार आहे. भरतनाट्यम नृत्यशैली, संगीत आणि भक्तीभाव यांनी परिपूर्ण अशी ही प्रस्तुती श्री दत्तगुरूंच्या करुणामय दर्शनाचा अनुभव देणारी ठरणार आहे….

‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’च्या माध्यमातून वैचारिक कक्षा रुंदावतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २३: मनुष्याला संवेदना अभिव्यक्तीचे वरदान लाभले आहे. या अभिव्यक्तीसाठी त्याच्याकडे भाषा, साहित्य, पुस्तके ही माध्यमे आहेत. अभिव्यक्ती संपते तिथे संस्कृती संपते. त्यामुळे ही प्रगल्भ संस्कृती जपण्याची गरज असून हा सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम पुस्तकांच्या माध्यमातून होत असते. नागपूर पुस्तक महोत्सवांतर्गत होत असलेल्या ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’च्या माध्यमातून प्रगल्भता येऊन जाणिवा विस्तारित होतील. विविधांगी विषय…

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित आंतर-महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा – मराठी रंगभूमीच्या इतिहासातील नवं पर्व

मराठी रंगभूमीचा वारसा अत्यंत समृद्ध आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक जाणीवा जागृत करणाऱ्या नाटकांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेली भव्य आंतर-महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा हा खरोखरच मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे—ही केवळ एक स्पर्धा नसून, नवोदित कलाकार, दिग्दर्शक,…

कणकवलीत ९ नोव्हेंबरला भव्य वारकरी दिंडी सोहळा; हजारो वारकरी सहभागी होणार

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने कणकवली येथे ९ नोव्हेंबर रोजी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वारकरी एकत्र येणार असल्याने संपूर्ण तालुक्यात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. या दिंडीचे प्रस्थान सकाळी ८.३० वाजता एस.टी. वर्कशॉप…

वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘सार्ध शताब्दी’ महोत्सवास सुरुवात 

देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ‘वंदे मातरम्’ चे समूहगान होणार आहे. ‘सार्ध शताब्दी’ महोत्सवाच्या माध्यमातून पुढील वर्षभर राज्यभरात राबवले जाणार आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वंदे मातरम गीतामध्ये  देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. स्वातंत्र्य…

मालवणच्या ‘शिवराज भूषण’ महानाट्याचे डिसेंबरमध्ये व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण

छत्रपती शिवाजी महाराज आणि कवी भूषण यांच्या पराक्रमाची गाथा उलगडणाऱ्या ‘शिवराज भूषण’ या महानाट्याला मालवणातील चारही प्रयोगांमध्ये रसिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. हाऊसफुल्ल प्रयोगांच्या यशानंतर आता हे महानाट्य डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सिंधुदुर्गात पाच प्रयोगांसह व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणार असल्याची माहिती श्री शिवराज मंचचे प्रमुख व निर्माते भूषण साटम यांनी पत्रकार परिषदेत दिली. जानेवारी महिन्यात या महानाट्याचे…

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम कार्यक्रमासाठी ९५.३५ कोटींची तरतूद

शिख धर्माचे नववे गुरू आणि ‘हिंद-की-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या भव्य राज्यस्तरीय महोत्सवासाठी ९५ कोटी ३५ लाख ६४ हजार रूपये उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या…

राज्य सरकारचे तज्ज्ञ अनुवादकांना आवाहन

भाषा संचालनालयामार्फत प्रशासकीय, कायदेविषयक, महसूल, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयांवरील अभिलेख व कागदपत्रातील मजकूर अनुवाद करण्यासाठी खासगी नामावली तयार करण्यात येत आहे. यासाठी तज्ज्ञ अनुवादकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अभिलेख व कागदपत्रांच्या फारसी व उर्दू मजकुरांचे इंग्रजी व मराठी भाषेत अनुवाद करणे तसेच मराठी व इंग्रजी भाषेतील मजकुराचे फारसी व उर्दू भाषेत अनुवाद करणे, तसेच…

बालकवींच्या कवितांचे गारुड शतकानंतरही कायम: ‘बालकवी : एक शापित गंधर्व’ या कार्यक्रमात सतीश लळीत यांचे प्रतिपादन

बालकविता, निसर्गकविता आणि गूढगंभीर अर्थवाही कविता अशा काव्याच्या विविध प्रकारात बालकवींनी अत्यंत ताकदीने स्‍वच्छंद विहार केला. अवघे २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या विलक्षण प्रतिभावान कवीचे गारुड त्यांच्या निधनाला शतक उलटले तरी आजही टिकून आहे, असे प्रतिपादन निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी नुकतेच येथे केले. ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या आठव्या मासिक कार्यक्रमात ते बोलत होते….