‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

 ‘खजिन्याची शोधयात्रा या पुस्तकाच्या लेखनासाठी प्रशांत पोळ यांनी व्यापक संशोधन आणि अभ्यास केला आहेया पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभवइतिहाससंस्कृती मांडण्यात आली असल्याने शासनाच्या माध्यमातून हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईलपुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाचा मोठा खजिना जनतेपर्यंत जाईलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रशांत पोळ लिखित ‘खजिन्याची शोधयात्रा‘ या पुस्तकाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होतेयावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटीलमध्य प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंहमंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉगोबंदेगलूरकरस्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडेराष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक व पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आदी उपस्थित होते.

प्रशांत पोळ यांचे पुस्तक लेखनासाठी अभिनंदन करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेआपला इतिहासपरंपरासंस्कृतीचे जतन करणे आपले कर्तव्य आहेआपल्या समाजाचे तेज आणि आत्माभिमान संपविण्याचे काम परकियांनी केल्याने आपण पारतंत्र्यात गेलोभारत समृद्ध देश होतापरकीय आक्रमकांनी आपल्या संपत्तीची लूट केलीआपले ज्ञान आणि संस्कृती ही आपली शक्ती आहे हे लक्षात घेऊन ज्ञानकेंद्रे उध्वस्त करणेआपल्या संस्कृतीची प्रतिके जमिनदोस्त करणे आणि आपल्यावर त्यांची संस्कृतीपरंपरेचा पगडा बसविण्याचे काम सातशेहून अधिक वर्ष चाललेत्यामुळे आपला इतिहास माहित नसलेल्या पिढ्या तयार झाल्या आणि भारत पारतंत्र्यात गेला.

वेगवेगळ्या संशोधकांनी आपल्या संशोधनाने आपली संस्कृती भारताबाहेर गेली हा निष्कर्ष काढला आहेजगातील इतर संस्कृती नष्ट पावल्या आहेतपूर्वीपासून असलेली आणि अजूनही चालत आलेली भारत ही एकमेव संस्कृती आहेढोलावीरालोथलबद्दल प्रशांत पोळ यांनी पुस्तकात वर्णन केले आहेआजच्या स्थापत्य शास्त्राला अपेक्षित गोष्टी सहा हजार वर्षापूर्वी असल्याचे त्यातून पहायला मिळते.

युरोपीय देशात जेव्हा संस्कृतीची संकल्पना स्पष्ट नव्हती तेव्हा आपली संस्कृती विकसित स्वरुपात होतीसंस्कृतसारखी भाषा विकसित स्वरुपात आपल्याला माहित होतीभारताचा हा ज्ञानाचा खजिना फार जुना आहेही सिंधू संस्कृतीदेखील आहे आणि सरस्वती संस्कृतीदेखील आहेभौतिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न अशी ही संस्कृती होतीपहिल्या शतकातले भारताचे जगातील व्यापारातले स्थान ३३ टक्के होतेआपल्या या इतिहासाची माहिती आपल्याला असायला हवीदेशाचा हा इतिहासआपले वैभव आणि गणितात भारताने केलेली प्रगतीदेखील या पुस्तकातून मांडण्यात आली आहे.

देशात हिंदवी स्वराज्यमराठ्यांचे साम्राज्य होते ते आपण शिकू शकलो नाहीत्यामुळे आपली संस्कृती ज्ञान आपल्याला माहिती पाहिजे आणि ते पुढेही न्यावे लागेलआयुर्वेदातील संहितावरही संशोधन झाले पाहिजेया पुस्तकातून सर्वांना मार्गदर्शन मिळेलज्ञानाची ही शोधयात्रा अशीच सुरू रहावीअशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

यावेळी लेखक प्रशांत पोळ म्हणाले२०१७ साली प्रकाशित ‘भारतीय ज्ञानाचा खजिना‘ या पुस्तकाला सर्व शासकीय वाचनालयात वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळालाभारतीय विचारवंत अनेक ज्ञानशाखांमध्ये जगामध्ये पुढे होतेदुर्दैवाने जगात ज्या परदेशी संशोधकांच्या नावावर विविध शोधांचे जनक असे नाव लागले ते अनेक शोध त्यापूर्वी भारतात लागलेले आहेतमात्रते आपल्याला पुढे सांगितले गेले नाहीजगाचे विश्वगुरू होण्यासाठी आपण प्रयत्न करत असताना आपल्याला आपल्या समृद्ध संस्कृतीचीज्ञानपरंपरेची माहिती आणि अभिमान असला पाहिजेअसेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *