वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘सार्ध शताब्दी’ महोत्सवास सुरुवात 

Spread the love

देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ‘वंदे मातरम्’ चे समूहगान होणार आहे. ‘सार्ध शताब्दी’ महोत्सवाच्या माध्यमातून पुढील वर्षभर राज्यभरात राबवले जाणार आहेत.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वंदे मातरम गीतामध्ये  देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना अभिवादन आणि मातृभूमीला वंदन करणारे संस्कार या गीताच्या समूह गायनातून होणार असल्याने शासकीय स्तरावरून शैक्षणिक संस्था आणि शासकीय आस्थापनांमध्ये ‘वंदे मातरम्’ गीताचे समूहगान आयोजित करण्याबाबत परिपत्रक आणि अध्यादेश जारी करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभागानेही राज्यस्तरीय तसेच तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. राज्यभरात निबंध लेखन, परिसंवाद, प्रदर्शने आणि वक्तृत्व स्पर्धा असे कार्यक्रम होणार आहेत. देशभक्ती जागृत करणाऱ्या सार्ध शताब्दी महोत्सवात सर्वानी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा,असे आवाहन मरकारच्या वतीने करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *