स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे महान साहित्यकार प्रेमचंद जयंती साजरी

Spread the love

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिंदी विभागामार्फत हिंदी साहित्यातील महान साहित्यकार, कादंबरीकार कथाकार मुंशी प्रेमचंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. कैलास राबते, हिंदी विभाग प्रमुख डॉ. हंबीरराव चौगले, डॉ. देविदास हरगिले, डॉ. सुमेधा नाईक, प्रा.अन्वेषा कदम व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अन्वेषा कदम यांनी केले.

यावेळी डॉ.हंबीरराव चौगले यांनी प्रेमचंद यांच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या साहित्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रेमचंद यांनी पारतंत्र्याच्या काळामध्ये सर्व साहित्य लिहिले. त्यांच्या साहित्यामध्ये राष्ट्रप्रेम, जातिवाद विरोध, शेतकरी समस्या स्त्रियांच्या समस्या, भारतीय समाज व्यवस्था याबद्दल मांडणी केली, असे प्रा. चौगले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. कैलास राबते यांनी प्रेमचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकत साहित्यकार समाजाला कशाप्रकारे दिशा दाखवत असतात याविषयी मार्गदर्शन केले.

यानिमित्त हिंदी विभागामार्फत प्रेमचंद यांच्या जीवनावर व साहित्यावर प्रकाश टाकणारी ऑनलाइन प्रश्नमंजुषा घेण्यात आली, या प्रश्नमंजुषेमध्ये शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आभार प्रा. अन्वेषा कदम यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्रा.खोबरे, प्रा.तावडे, प्रा. बेळेकर, प्रा.टिकले, प्रा. फाटक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *