मुंबईसारख्या मायानगरीत गेली दहा वर्षे ‘आम्ही कोकणकर संघटना’ कोकणच्या रंगभूमी, नमन, बहुरंगी लोककला, मराठी नाटक, शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज यांच्या माध्यमातून कोकणचा सांस्कृतिक ठेवा जपत आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ, पारंपरिक कलेला नवे पैलू आणि सामाजिक प्रबोधन हेच संघटनेचे मुख्य ध्येय!याच उपक्रमाचा भाग म्हणून ‘कोकण सन्मान सोहळा २०२५’ रविवार, १३ जुलै रोजी सायं. ७.१५ वा. छत्रपती श्री शिवाजी नाट्यमंदिर, दादर (मुंबई) येथे मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे.
कोकण सन्मान या सोहळ्याचे प्रमुख प्रयोजक म्हूणन मोलाचा सहभाग खातू मसाले उद्योजक, सर्वेश ज्वेलर्स, गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीस, राज कॉमर्स क्लासेस आणि ग्राइंडले फार्मास्युटीकल्स प्रायव्हेट मिलिटेड यांचे लाभले आहे. सन्मान कोकणचा आपल्या कोकणच्या माणसांचा, या घोषवाक्याखाली कोकणच्या मातीत वाढलेल्या आणि विविध क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कर्तृत्वानाने योगदान असलेल्या व्यक्तींचा गौरव कोकण युवा सन्मान पुरस्कार 2025 पुरस्काराचे मानकरी कला क्षेत्र (अभिनेता प्रथमेश शिवलकर),प्रसार माध्यम आणि प्रसिध्दी क्षेत्र(तृप्ती राणे), पत्रकारिता क्षेत्र (दिपक कारकर), उद्योजक क्षेत्र(आदित्य दत्ताराम शिगवण), शैक्षणिक क्षेत्र (नारायण आनंद गवस), सामाजिक व गड संवर्धन क्षेत्र (संगमरत्न फाऊंडेशन – अल्पेश सोलकर), वैद्यकीय क्षेत्र (डॉ श्रीधर धोंडू धोपट) यांना देण्यात येणार आहे तर विशेष कोकण सन्मान पुरस्कार 2025 संस्कृतिक क्षेत्र (शाहिर रामचंद्र घाणेकर), (साई श्रद्धा कला पथक, श्री संदीप कानसे), लोकप्रिय दोडवलीकर नमन मंडळ यांना देण्यात येणार आहे.
कोकणवासीयांच्या आम्ही कोकणकर संस्थेच्या वतीने यंदा रविवार, दिनांक 13 जुलै रोजी, सांयकाळी 07:15 वाजता, छत्रपती श्री शिवाजी नाट्यमंदिर दादर (मुंबई ) येथे संपन्न होणार आहे. आम्ही कोकणकर या संघटनेच्या वतीने दरवर्षी या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाच्या कार्यक्रमामध्ये कोकणातील सामाजिक, सांस्कृतिक, कला शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मांदियाळींचे विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
या सोहळ्यास शालिग्राम खातू (खातू मसाले उद्योग), अनंत फिलसे (सर्वेश ज्वेलर्स उद्योजक), विवेक गद्रे (एम.डी.गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीस), लोकेश राज्याध्यक्ष (राज कॉमर्स क्लासेस उद्योजक), रामकृष्ण कोलवणकर (ग्राईंडले फार्मास्युटिकल्स पी व्ही टी चेअरमन आणि एम डी),अनिल नगवणे (अध्यक्ष कुणबी समाजोन्नती संघ मुंबई), अजित पितळे (संस्थापक कोकण कट्टा संस्था), रवींद्र मटकर (अध्यक्ष नमन लोककला संस्था), विकास लांबोरे (उच्याशिक्षित, कलगी तुर्यातील नामवंत उत्कृष्ट शाहीर) आणि कोकणासाठी तळमळीने काम करणारा प्रसाद गावडे (कोकणी रानमाणूस), तसेच कोकणच्या विविध क्षेत्रांत कार्य करणार्या व्यक्ती, उद्योजक, कलाकार, शाहिरवर्ग, रील्स स्टार, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदींचा विशेष सन्मान गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
तसेच या कोकण सन्मान सोहळ्यात विशेष आकर्षण आणि मनोरंजक म्हणून ठरेल ते म्हणजे कॉमेडी स्क्रिप्ट आणि लाखोंच्या ताफ्यात नजरेच्या कटाक्षाने हृदयाची ठोका चुकवणारी, सामाजिक, काल्पनिक, ऐतिहासिक विषयाला गवसणी घालणारी ज्वलंत नाट्यकलाकृती गर्जना कहाणी हिंदुत्वाची. हिचे सादरीकरण होणार आहे. कोकणी माणसांचा सन्मान करण्याचा, त्यांच्या कर्तृत्वाला दाद देण्याचा, आणि आपल्या कोकण संस्कृतीचा गौरव साजरा करण्याचा एक आगळा-वेगळा सोहळा, कोकण सन्मान सोहळा 2025‘आम्ही कोकणकर’ या संघटनेच्या वतीने साजरा होतोय.
कोकण सन्मान सोहळ्याला कोकणवासियांनी आणि रसिक प्रेक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यकामाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकामार्फत करण्यात आले असून सदर कार्यक्रम रसिकांसाठी मोफत असून प्रवेशिका तसेच अधिक माहितीसाठी कृष्णा येद्रे, मो.9773142819, 8652141561 यांच्याशी संपर्क साधावा असे, आवाहन संस्थापक आणि आम्ही कोकणकर संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.