मसुरे सुपुत्र अर्थसंकेतचे डॉ. अमित बागवे यांना ‘बिझनेस आयकॉन’ सन्मान पुरस्कार

Spread the love

‘अर्थसंकेत’ या मराठीतील पहिल्या व्यवसाय व अर्थविषयक वर्तमानपत्राचे संस्थापक आणि संपादक  मसुरे गावचे सुपुत्र डॉ. अमित बागवे यांना ‘बिझनेस आयकॉन मॅगझीन’तर्फे ‘बिझनेस आयकॉन’ हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे. ‘मराठी पाऊल पडते पुढे २०२५’ या कार्यक्रमात त्यांच्या आर्थिक साक्षरता, उद्योजकता आणि डिजिटल माध्यमांमधील नवप्रवर्तन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात येऊन पुरस्कारा प्रदान करण्यात आला.

 ‘बिझनेस आयकॉन’ कार्यक्रम एमसीसीआयए, पुणे येथील सुमंत मुळगावकर सभागृहात पार पडला. या वेळी सुप्रसिद्ध उद्योजक सीए चंद्रशेखर चितळे, श्री. अभय गाडगीळ आणि श्री. राहुल जाधव  उपस्थित होते. या वेळी सूत्रसंचालन  बिझनेस आयकॉन मॅगझीनचे संपादक श्री. पराग गोरे यांनी केले.

डॉ. बागवे यांना यापूर्वीही विविध मान्यवर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ अमित बागवे हे १०० हून अधिक प्रशिक्षण सत्रांमधून MSMEs ना डिजिटल व आर्थिक परिवर्तनासाठी मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय, त्यांनी गुंतवणूक, व्यवसाय, आर्थिक नियोजन या विषयांवर प्रभावी पुस्तकेही लिहिली आहेत.डॉ. बागवे यांची उपस्थिती विविध माध्यमांमध्ये आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सातत्याने पाहायला मिळते. त्यांचा प्रवास नवोदित उद्योजकांसाठी दीपस्तंभ ठरतो.

हा पुरस्कार म्हणजे सामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या आणि मराठी भाषिक भागात शाश्वत व्यवसाय संस्कृती रुजवण्याच्या कार्यास दिलेली सन्माननीय दाद आहे असे प्रतिपादन  पुरस्कार वितरण प्रसंगी डॉक्टर अमित बागवे यांनी केले. विविध मान्यवरांनी यावेळी आपले विचार व्यक्त केलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *