आज मराठी माध्यम जगतात दरदिवशी नवनवी बातम्यांची, शब्दांची आणि तंत्रज्ञानाची क्रांती होत असताना माध्यमजगतातील तरुण माध्यमकर्मीनी जपलेली विश्वासार्हता ही प्रेरणादायी आहे. मराठी माध्यमात वृत्तनिवेदक आणि वृत्तनिर्माते यांचे पुरस्कार सोहळे असताना वृततंत्रज्ञाचा सन्मान करत मुक्तपीठ समुहाने खऱ्या अर्थाने पत्रकारितेचा सन्मान केला आहे. मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे यांच्या २०२४ भाजपा जिंकली कशी या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुक्तपीठ सन्मान सोहळ्याने मराठी पत्रकारीतेतील निस्पृह कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला. यावेळी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार भास्कर जाधव, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, ज्येष्ठ वृत्तनिवेदक भूषण करंदीकर यांच्या प्रमुख उपस्थित हा सन्मान सोहळा संपन्न झाला.
मुक्तपीठ सन्मानाने पीसीआर डायरेक्टर योगेश बारड यांना गौरवण्यात आले. न्यूज १८ लोकमत या न्यूज चॅनेलमध्ये योगेश बारड हे पीसीआर डायरेक्टर आहेत. तांत्रिक कौशल्याबरोबरच बातमीची चांगली समज असलेला पीसीआर डायरेक्टर म्हणून ते ओळखले जातात.
सर्वोत्तम स्पेशल शो प्रोडक्शनसाठी यशवंत साळवे यांना मुक्तपीठ सन्मानाने गौरवण्यात आले. झी २४ तास ते पुढारी न्यूज या प्रवासात यशवंत साळवे यांनी नेहमीचं काम सांभाळतानाच स्पेशल शोंच्या प्रोडक्शनचीही जबाबदारी समर्थपणे सांभाळतात. त्यांनी बियॉन्ड न्यूज या मराठीतील पहिल्या explainer showची उंची वाढवणारी कामगिरी प्रोडक्शन टीमच्या माध्यमातून बजावलेली आहे.
सर्वोत्तम स्पेशल शो ग्राफिक्ससाठी उद्देश कांबळे यांना मुक्तपीठ सन्मानने गौरवण्यात आले. तरुण वयातच भन्नाट वेगळ्या ग्राफिक्स कल्पनांसाठी ओळखले जातात. त्यांनी बियॉन्ड न्यूज या मराठीतील पहिल्या एक्सप्लेनर शोसाठी केलेले ग्राफिक्स हे शोला एक वेगळी ओळख मिळवून देणारे होते.
सर्वोत्तम आऊटपूट इंचार्ज शरद जाधव यांनाही मुक्तपीठ सन्मानने गौरवण्यात आले. एबीपी माझा, टिव्ही नाईन ते टीव्ही १८ या प्रवासात शरद जाधव यांनी नेहमीच्या आऊटपुटबरोबरच प्राइम टाइम शोचीही जबाबदारी सक्षमतेनं सांभाळली. सध्या टीव्ही १८चा इव्हिनिंग प्राईम टाइम गाजत आहे.
सर्वोत्तम इनपूट प्रोड्युसर असणाऱ्या काम्या भट्टाचार्य यांचाही मुक्तपीठ सन्मान करण्यात आला. न्यूज चॅनलमधील इनपुट म्हणजे सतत, अथक आणि दक्ष राहावं लागणारा विभाग. काम्या भट्टाचार्य यांनी फिल्डनंतर इनपुट टीममध्ये काम करताना न्यूजरुम गाजवत ठेवण्याची कामगिरी सातत्यानं पार पाडली आहे.
सर्वोत्तम व्हिडीओ एडिटर म्हणून श्रीकांत परब यांचा मुक्तपीठ सन्मान करण्यात आला. टीव्ही चॅनल्सच्या पडद्यावर दिसणारी बातमी ही जास्तीत जास्त पाहिली जाण्यासाठी तिचं एडिटिंग चांगलंच असावं लागतं. टीव्ही १८ लोकमतचे व्हिडीओ एडिटर श्रीकांत परब हे त्यांच्या क्रिएटिव्ह शैलीसाठी ओळखले जातात.
सर्वोत्तम व्हिडीओ जर्नलिस्ट या सन्मानासाठी अरुण पेडणेकर यांना गौरवण्यात आले. रिपोर्टर आणि व्हिडीओ जर्नलिस्ट हे चॅनलच्या फिल्डवरील रथाची दोन चाकं. एनडीटीव्हीचे अरुण पेडणेकर यांचा दृष्यपत्रकारीतेसाठी हा सन्मान अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
सर्वोत्तम टीव्ही रिपोर्टर या सन्मानासाठी कृष्णा सोनारवाडकर यांना मुक्तपीठकडून गौरवण्यात आले. मराठी न्यूज चॅनल्समधील मोठ्या घडामोडी कव्हर करताना दिसणारा चर्चेतील चेहरा म्हणजे कृष्णा सोनारवाडकर. मोठ्या घडामोडींबरोबरच कृष्णा हे बातम्यांमागील बातम्याही शोधतात. टीव्ही९ मराठीच्या माध्यमातून सत्यशोधक पत्रकारितेचा वसा त्यानी जपला आहे.
सर्वोत्तम डिजिटल व्हेंचरसाठी लगाव बत्तीला मुक्तपीठी सन्मानाने गौरवण्यात आले. गेल्या अवघ्या दोन वर्षात नावारुपाला आलेलं आणि वेगळंपण मिळवणारं मराठी डिजिटल व्हेंचर लगाव बत्ती हे मराठीतील सध्याच्या सर्वोत्तम डिजिटल व्हेंचरपैकी एक आहे. आपल्या विषय़ांच्या निवडीतील वेगळंपण, मांडणीतील वेगळंपणामुळे लगाव बत्तीनं आपलं वेगळंपण मिळवलं आहे.
सर्वोत्तम डिजिटल रिपोर्टर म्हणून ओंकार वाबळे याला मुक्तपीठ सन्मानने गौरवण्यात आले. डिजिटल क्षेत्रात फिल्डवर सतत सक्रिय असणारे ओंकार वाबळे परिपक्व मांडणी, सादरीकरणासाठी ओळखले जातात. केवळ वरवरचं न मांडता सखोल मांडणीवर त्यांचा भर असतो.
मुक्तपीठने डिजीटलसोबत पत्रकारीतेतील अनेक लढवय्या पत्रकारांचाही यावेळी गौरव केला. सर्वोत्तम निर्भीड पत्रकार – दीपक जाधव महाराष्ट्र टाईम्स, उदय नागरगोजे पुढारी न्यूज, आमीर हुसैन, जय महाराष्ट्र आणि सर्वोत्तम पत्रकार मित्र मंगेश चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.
मुक्तपीठकडून वस्तुनिष्ठ पत्रकारीतेचा गौरव करताना डिजीटल आणि टिव्ही जर्नालिझममधील अनेक ज्येष्ठ पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला. सर्वोत्तम उल्लेखनीय पत्रकारितेसाठी रवींद्र आंबेकर, सर्वोत्कृष्ट संपादक – कमलेश सुतार, सर्वोत्तम अँकर – विशाल परदेशी, सर्वोत्तम संवेदनशील अँकर वृषाली यादव सारंग, सर्वोत्तम स्पेशल शो अँकर यामिनी दळवी, सर्वोत्तम संवेदनशील रिपोर्टर – नेहा पुरव, यांचाही मुक्तपीठ सन्मानाने गौरव करण्यात आला.