26 जुलै रोजी कुडाळमध्ये शिवचरित्र आणि दुर्गसंवर्धनावर मार्गदर्शन, प्रदर्शन आणि व्याख्यानांचे आयोजन

Spread the love

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ११ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून शिवप्रेमींनी ‘शिव अभिमान सोहळा’ आयोजित केला आहे. येत्या शुक्रवार, दिनांक २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथील शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या सभागृहात हा विशेष कार्यक्रम पार पडणार असून, यात विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्र, दुर्गसंवर्धन, एमओडीपीआय मार्गदर्शन व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या उपक्रमात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांचा सहभाग असून, यामार्फत शिवमहाराजांच्या जीवनकार्याचा प्रचार-प्रसार, तसेच ऐतिहासिक किल्ल्यांचे संवर्धन यावर भर दिला जाणार आहे.

कार्यक्रमात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पुणे येथील शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या वतीने ‘शिव अभिमान सोहळा’ संपन्न होणार आहे. यावेळी शिवप्रेमींना जागतिक पातळीवर शिवकिल्यांचा वारसा टिकवण्यासाठी माहिती आणि मार्गदर्शन देण्यात येणार आहे. विशेषतः महाराष्ट्रातील ११ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कसे समाविष्ट करता येतील, यावर विशेष चर्चा होणार आहे.

शिवप्रेमी इतिहासतज्ज्ञ डॉ. संदीप वाळके, श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे पदाधिकारी, तसेच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. शाळा-महाविद्यालयांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *