किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा आज दुर्गराज रायगडावर संपन्न झाला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अप्रतिम आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास लाखोंच्या संख्येत शिवप्रेमींनी कालपासून रायगडावर गर्दी केली आहे.  शिवकालीन मर्दानी व साहसी खेळांनी वातावरण शिवमय झाले होते. आज सकाळपासूनच शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळाली. सालाबादप्रमाणे…

गोव्यात राजभाषा मराठीसाठी एकवटले मराठीजन 

मराठी राजभाषा करण्यासाठी पुढे सरसावलेल्या मराठी राजभाषा निर्धार समितीने राजभाषा मेळाव्याची घोषणा केली आहे. अभिजात मराठी गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे, यासाठी राज्यभर 12 प्रखंड मेळावे आयोजित केले आहेत. मराठी राजभाषा निर्धार समितीचे अध्यक्ष प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी या मेळाव्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. प्रखंड मेळाव्यात 7 जून डिचोली, 8 जून रोजी तिसवाडी तालुक्यात मेळावा आयोजित…

गुजराती, सिंधी, उर्दु, तमिळ, तेलगू भाषिक पहिलीच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार सोप्या भाषेत ‘मराठी’चे धडे

त्रिभाषा सूत्रानुसार सर्व शाळांमध्ये मराठी बंधनकारक करण्यात आली. पण, महाराष्ट्रातील गुजराती, सिंधी, तेलुगू, तमीळ, उर्दू भाषिक पहिलीतील विद्यार्थ्यांना मराठी सहजपणे समजावी म्हणून स्वतंत्रपणे सोप्या शब्दांतील मराठीच्या पुस्तकांची ‘बालभारती’कडून छपाई सुरू केली आहे. मराठीबद्दलची गोडी वाढावी हा त्यामागील हेतू आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदल झाला असून…

‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 ‘खजिन्याची शोधयात्रा‘ या पुस्तकाच्या लेखनासाठी प्रशांत पोळ यांनी व्यापक संशोधन आणि अभ्यास केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृती मांडण्यात आली असल्याने शासनाच्या माध्यमातून हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाचा मोठा खजिना जनतेपर्यंत जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रशांत पोळ लिखित ‘खजिन्याची शोधयात्रा‘ या पुस्तकाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित प्रकाशन कार्यक्रमात ते…

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी 25 कोटींची तरतूद 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सांगली जिल्ह्यात वाटेगाव (ता. वाळवा) येथे त्यांच्या जन्मभूमीत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी शासनाने 25 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या स्मारकाच्या नियोजित स्थळाची पाहणी करून स्मारकाची जागा पंधरा दिवसात ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले….

वाडी रत्नागिरी डोंगर परिसरात साकारणार ‘दख्खन केदारण्य’

महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर विकास आराखड्याची सुरुवात वृक्षारोपणाने होत असून विकास आराखडा अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथे राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा प्रशासन यांच्या…

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या 6 जूनपासून राज्यातल्या सर्व ‘आयटीआय’ मध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमिताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व…

अणाव रामेश्वर मंदिर येथे ‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसविण्याच काम सुरु. 

कुडाळ तालुक्यातील अणाव रामेश्वर मंदिर हे क वर्ग पर्यटन असून हे धार्मिक पर्यटन स्थळ पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे यासाठी अणाव देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार निलेश राणे यांनी पहिल्या टप्यात पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून रामेश्वर मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक…