सुरेश ठाकूर यांना केंद्रीय ‘बालसेवा पुरस्कार’ जाहीर, बेळगाव येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा
मालवण, दि. प्रतिनिधी –आचरे (ता. मालवण) येथील सानेगुरूजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकूर (गुरूजी) यांना अखिल भारतीय सानेगुरूजी कथामालेचा मानाचा केंद्रीय ‘बालसेवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूर येथे पार पडलेल्या निवड समितीच्या बैठकीत एकमताने ठाकूर गुरूजी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अखिल भारतीय सानेगुरूजी केंद्रीय समितीचे अध्यक्ष मा. हसन देसाई (कोल्हापूर) व सचिव…
