“माझी माती, माझा बाप्पा” – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास कार्यशाळा

मुंबई | गणेशोत्सव हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आत्मा मानले जाते. अलीकडेच या लोकप्रिय सणाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून गौरवण्यात आले असून, पर्यावरणपूरकतेचा संदेश देत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. अशाच उपक्रमांमध्ये एक सर्जनशील भर घालत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तर्फे “माझी माती, माझा बाप्पा” ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही…

“स्वतःचा आवाज – व्यक्तिमत्व घडवण्याचा मूलाधार” : सावंतवाडीत २७ जुलै रोजी श्रीनिवास नार्वेकर यांचे मुलांसाठी विनामूल्य व्याख्यान

सावंतवाडी – व्यक्तिमत्त्व घडवण्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला आवाज आणि देहबोली. अभिनयामध्येदेखील या बाबी फार महत्वाच्या असतात. याच विषयावर मूळ सावंतवाडीचे व सध्या मुंबईस्थित प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक-रंगकर्मी व आवाजतज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांचे ८ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य व्याख्यान बालरंग संस्थेच्या वतीने व मुक्ताई अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जुलैला सकाळी ९.३० ते दुपारी २…

26 जुलै रोजी कुडाळमध्ये शिवचरित्र आणि दुर्गसंवर्धनावर मार्गदर्शन, प्रदर्शन आणि व्याख्यानांचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ११ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून शिवप्रेमींनी ‘शिव अभिमान सोहळा’ आयोजित केला आहे. येत्या शुक्रवार, दिनांक २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथील शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या सभागृहात हा विशेष कार्यक्रम पार पडणार असून, यात विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्र, दुर्गसंवर्धन, एमओडीपीआय मार्गदर्शन व प्रदर्शन आयोजित करण्यात…

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार: नितीन गडकरींचा सन्मान आणि मराठी अस्मितेचा गौरव

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात लोकमान्य टिळक यांच्या १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून गडकरी यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा…

गणेशोत्सव: महाराष्ट्राचा राज्य महोत्सव – एक सांस्कृतिक गौरव

गणेशोत्सव.. मराठी मनाची खरी ओळख.. आराध्य दैवत असणाऱ्या श्रीगणेशाचा सोहळा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आनंद सोहळा असतो.. पुण्या मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा निनाद ढोल ताशांच्या गजरात आसमंताला भिडतो.. आणि अवघ्या महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या शहरांना हाच गणेशोत्सव महानगरांच्या जल्लोषाचा दिमाख चढवतो.. आगमनसोहळ्यापासून ते विसर्जन सोहळ्यापर्यंतचा हा उत्सव मराठी सणांसोबत मराठीमनाची वीण घट्ट जोडतो आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि…

चला हवा येऊ द्या चा नवा सिझन रसिकांच्या पसंतीस उतरेल का ?

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजेच चला हवा येऊ द्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेसुद्धा नव्या आणि दमदार रुपात. प्रेक्षकांना आता कॉमेडीचं गँगवॉर अनुभवायला मिळणार आहे. हास्याचा एक भन्नाट महोत्सव साजरा होणार आहे, जिथे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट विनोदवीर आपलं विनोदी कौशल्य सादर करतील. या नव्या सिझनमध्ये धमाकेदार स्किट्स, गँग लॉर्ड्समध्ये रंगलेली बोलीची स्पर्धा, खास…

YouTube monetisation: 15 जुलैपासून नवीन नियम लागू, AI आणि कॉपी कंटेंट क्रिएटर्संना मोठा झटका !

यूट्यूबवरून पैसे कमविणे आता पूर्वीसारखे सोपे राहणार नाही. कारण येत्या 15 जुलै 2025 पासून YouTube आपल्या मॉनेटायझेशन धोरणात मोठे बदल करत आहे. या नव्या धोरणांमुळे अनेक कंटेंट क्रिएटर्सना आपल्या व्हिडीओ स्वरूपात आणि कल्पकतेत बदल करावा लागेल. YouTube आता “मास-प्रोड्युस्ड”, म्हणजे मोठ्या प्रमाणात एकसारखा किंवा कॉपी पद्धतीने तयार होणारा कंटेंट, यावर निर्बंध आणत आहे. नवीन नियमानुसार…

18 आणि 19 जुलैला ‘गझलांचा खजाना” महोत्सव सजणार !

दिवंगत गझल सम्राट पद्मश्री पंकज उधास यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘खजाना-फेस्टिव्हल ऑफ गझल्स २०२५’ १८ आणि १९ जुलैला नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये साजरा होणार आहे. कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए) व पेरेंट्स असोसिएशन थैलेसेमिक युनिट ट्रस्ट (पीएटीयुटी) यांच्या सहकार्याने होणाऱ्या या महोत्सवातून थॅलेसेमिया व कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी निधी संकलित केला जाणार आहे. नरिमन पॉइंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये…

The Folk आख्यान एका मिनिटात का हाऊसफुल्ल होतंय ?

आज आपल्या महाराष्ट्रात एक कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतोय — तो म्हणजे ‘The Folk आख्यान’!लोककथा, वीरगाथा, संतकथा, पुराणकथन — या सगळ्याला थेट रंगमंचीय आणि सांगीतिक सादरीकरणाची जोड देणारा हा अनोखा प्रयोग आहे. ‘Folk आख्यान’ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर तो आपल्या मातीतल्या शूर इतिहासाला, लोककथांना, ग्रामीण मातीच्या सुगंधाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर मार्ग आहे.कोणत्याही…

‘आम्ही कोकणकर’तर्फे कोकण सन्मान सोहळा २०२५ – कोकणच्या कर्तृत्वाला सलाम!

मुंबईसारख्या मायानगरीत गेली दहा वर्षे ‘आम्ही कोकणकर संघटना’ कोकणच्या रंगभूमी, नमन, बहुरंगी लोककला, मराठी नाटक, शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज यांच्या माध्यमातून कोकणचा सांस्कृतिक ठेवा जपत आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ, पारंपरिक कलेला नवे पैलू आणि सामाजिक प्रबोधन हेच संघटनेचे मुख्य ध्येय!याच उपक्रमाचा भाग म्हणून ‘कोकण सन्मान सोहळा २०२५’ रविवार, १३ जुलै रोजी सायं. ७.१५ वा. छत्रपती…