राज्यभरातील ‘आयटीआय’ संस्थांमध्ये शिवराज्याभिषेक दिनी राष्ट्रहितावर व्याख्यानमालेद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत राज्यभरातील १०९७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) ‘पंचपरिवर्तन‘ संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेची सुरुवात झाली. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, इतिहासाची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाचे मूल्य रुजवणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी…
