संस्कृती फाउंडेशन लांजा रत्नागिरीच्या माध्यमातून विविध शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप

शैक्षणिक व सामाजिक स्तरावरून संस्कृतीचे कौतुक ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ संजीवन गुरुकुल पटवर्धन हायस्कूल रत्नागिरीच्या १२० विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक साहित्य वाटप सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून कायम कार्यरत असणाऱ्या संस्कृती फाउंडेशन लांजा या संस्थेच्या माध्यमातून प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षी देखील विविध शाळांना व त्यातील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नुकतेच रामचंद्र…

काटा लगा फेम शेफाली जरीवाला हिचे हृदयविकाराने निधन

‘काटा लगा गर्ल’ आणि ‘बिग बॉस 13’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. 27 जून रोजी रात्री शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. खरंच, ‘काटा लगा’ फेम शेफाली जरीवाला हिच्या निधनाच्या बातमीने अनेकांच्या मनात तीव्र नॉस्टॅल्जिया दाटून आला असेल.2000च्या दशकाच्या सुरुवातीला ‘काटा लगा’ हे गाणं म्हणजे…

प्रा. हरिभाऊ भिसे यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध कलावंत व शाहीर प्रा.हरिभाऊ भिसे यांना कोल्हापूर येथील मानवतावादी सांस्कृतिक चळवळ व दीक्षा फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. प्रा. हरिभाऊ भिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार जाहीर करण्यात…

लेखक प्रदीप कोकरे, कवी सुरेश सावंत यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. साहित्य अकादमीच्या वतीनं यंदा 24 भाषांसाठीचे ‘बाल साहित्य पुरस्कार’ आणि 23 भाषांसाठीचे ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आले. यंदा दोन मराठी साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळवले आहेत. कवी सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार तर लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळी…

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ‘मराठी उद्योजक अभिमान गीताचे’  भव्य लोकार्पण

मराठी उद्योजकतेचा गौरव करणारे आणि प्रेरणादायी ठरणारे ‘मराठी उद्योजक अभिमान गीत’ उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते सादर करण्यात आले. अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे गीत, ‘मी उद्योजक होणारच’ संस्थेद्वारे आयोजित ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषदेच्या निमित्ताने, ऐतिहासिक बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रथमच सादर करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सौ….

Special Ops 2 trailer : स्पेशल ऑप्स सिरीचा नवा भाग येणार भेटीला, हिम्मत सिंहची आता सायबर दहशतवादाविरुद्ध लढाई !

बॉलीवूड अभिनेता के के मेनन याच्या ‘स्पेशल ऑप्स’ या सुपरहिट वेब सीरिजने 2020 मध्ये प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. आता, तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्पेशल ऑप्स 2 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे. ही सीरिज 11 जुलै रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित…

तुळशीदास भोईटे यांच्या ‘2024 – भाजपा जिंकली कशी’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात रंगली राजकीय संवादाची चर्चा

‘२०२४ भाजपा जिंकली! कशी?’ पुस्तकाच्या मंचावर सत्ताधारी-विरोधकांची राजकीय जुगलबंदी! तुळशीदास भोईटेंच्या विश्लेषणाचं सर्वपक्षीय कौतुक!! महाराष्ट्र विधानसभेच्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालाची ‘२०२४ भाजपा जिंकली! कशी?’ या पत्रकार तुळशीदास भोईटे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि मुक्तपीठ सन्मान कार्यक्रम शुक्रवारी मुंबईत संपन्न झाला. हा कार्यक्रम म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांच्या वैचारिक जुगलबंदीचा विचारमंच ठरला. कार्यक्रमाचे अध्यक्ष एबीपी…

आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळाचे ५ हजार २०० विशेष बसेसचे नियोजन

आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात…

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन” म्हणून साजरा होणार

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या निर्णयाचा अध्यादेश सरकारने निर्गमित केला आहे. यापूर्वीच देशी गायीस “राज्यमाता–गोमाता” म्हणून घोषित करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे….

मसुरे सुपुत्र अर्थसंकेतचे डॉ. अमित बागवे यांना ‘बिझनेस आयकॉन’ सन्मान पुरस्कार

‘अर्थसंकेत’ या मराठीतील पहिल्या व्यवसाय व अर्थविषयक वर्तमानपत्राचे संस्थापक आणि संपादक  मसुरे गावचे सुपुत्र डॉ. अमित बागवे यांना ‘बिझनेस आयकॉन मॅगझीन’तर्फे ‘बिझनेस आयकॉन’ हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे. ‘मराठी पाऊल पडते पुढे २०२५’ या कार्यक्रमात त्यांच्या आर्थिक साक्षरता, उद्योजकता आणि डिजिटल माध्यमांमधील नवप्रवर्तन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात येऊन पुरस्कारा प्रदान करण्यात…