शैक्षणिक व सामाजिक स्तरावरून संस्कृतीचे कौतुक
४०० हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ
संजीवन गुरुकुल पटवर्धन हायस्कूल रत्नागिरीच्या १२० विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक साहित्य वाटप
सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून कायम कार्यरत असणाऱ्या संस्कृती फाउंडेशन लांजा या संस्थेच्या माध्यमातून प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षी देखील विविध शाळांना व त्यातील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
नुकतेच रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुल रत्नागिरी या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना ६० डझन वह्या वाटण्यात आल्या. यावेळी संस्कृती फाउंडेशन संस्थापक राजेश गोसावी अध्यक्ष गौतम कांबळे दानशूर व्यक्तिमत्व व संस्कृती सदस्य ओंकार आचरेकर, संस्कृती सदस्य शाहीर श्रीकांत बोंबले ,गुरुकुल प्रबंधक मनाली नाईक व अध्यापकवृंद उपस्थित होते.
याशिवाय आश्रम शाळा जावडे येथील २५० विद्यार्थ्यांना, मिस्त्री हायस्कूल रत्नागिरी ५० विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळा बोंबलेवाडी येथील २० विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद शाळा माचाळ येथील २० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपासपेटी, पेन वह्या या साहित्याचे वाटप करण्यात आले.
तर जिल्हा परिषद शाळा कोचरी नंबर एक या शाळेसाठी हार्मोनियम, महात्मा गांधी दुय्यम शिक्षण संस्था उमरे हायस्कूल रत्नागिरी या शाळेसाठी लेझीम ढोल पथक साहित्य यांचे वाटप करण्यात आले. साधारणता तीन लाखाहून अधिक किमतीचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले.
हा संपूर्ण उपक्रमासाठी विशेष योगदान ओमकार आचरेकर यांचे लाभले. या सर्व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमासाठी संस्कृतीचे संस्थापक राजेश गोसावी, अध्यक्ष गौतम कांबळे, उपाध्यक्ष संतोष म्हेत्रे, संघटक प्रियवंदा जेधे, संघटक सिद्धेश पांचाळ, सचिव विनोद बेनकर व संस्कृतीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.