“माझी माती, माझा बाप्पा” – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास कार्यशाळा

Spread the love

मुंबई | गणेशोत्सव हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आत्मा मानले जाते. अलीकडेच या लोकप्रिय सणाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून गौरवण्यात आले असून, पर्यावरणपूरकतेचा संदेश देत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. अशाच उपक्रमांमध्ये एक सर्जनशील भर घालत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तर्फे “माझी माती, माझा बाप्पा” ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

ही कार्यशाळा ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडणार असून, यात सहभागी होणाऱ्यांना शाडू मातीपासून आपल्या घरचा बाप्पा स्वतःच्या हाताने घडवण्याची संधी मिळणार आहे.

शिल्पकलेतील दिग्गजांचे मार्गदर्शन

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात प्रख्यात शिल्पकार विशाल शिंदे आणि किरण थोरात हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे, या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पूर्वअनुभवाची कोणतीही गरज नाही. ५ वर्षांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही सहभागी होता येईल.

प्रवेश शुल्क आणि सुविधा

👧 वय ५ ते ११ वर्षे : ₹१५००

👨 वय १२ वर्षांपासून पुढे : ₹१८००

सर्व साहित्य आयोजकांकडून उपलब्ध करून दिले जाईल. सुमारे १० इंच उंचीच्या मूर्ती बनवण्यावर भर दिला जाणार असून, मूर्ती घरी नेऊन ती सुकल्यानंतर त्यावर रंगभरणी कशी करावी याचेही मार्गदर्शन मिळणार आहे.

कलात्मकतेतून जागवूया पर्यावरणाचे भान

गणेशोत्सव म्हणजे फक्त उत्सव नव्हे, तर पर्यावरणाची जबाबदारीही. शाडू मातीपासून मूर्ती तयार करण्याचा हा उपक्रम पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

घरचा गणपती स्वतःच्या हाताने घडवण्याचा आनंद आणि समाधान याचा अनोखा अनुभव या कार्यशाळेतून मिळणार आहे. मात्र जागा मर्यादित असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपली जागा आरक्षित करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


📞 नोंदणीसाठी संपर्क :
Call/WhatsApp : ९८१९८२५४०२ / ८१६९८८२८९८
💳 QR कोडद्वारे पेमेंट करून आपली जागा आरक्षित करा
📧 पेमेंटचा स्क्रीनशॉट : pldeshpande111@gmail.com वर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *