मराठी राजभाषा करण्यासाठी पुढे सरसावलेल्या मराठी राजभाषा निर्धार समितीने राजभाषा मेळाव्याची घोषणा केली आहे. अभिजात मराठी गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे, यासाठी राज्यभर 12 प्रखंड मेळावे आयोजित केले आहेत. मराठी राजभाषा निर्धार समितीचे अध्यक्ष प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी या मेळाव्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
प्रखंड मेळाव्यात 7 जून डिचोली, 8 जून रोजी तिसवाडी तालुक्यात मेळावा आयोजित केला आहे. 14 जून रोजी कुंकळ्ळी, 15 जून रोजी सकाळी पेडणे व सायंकाळी पर्वरीत मेळावा होणार आहे. 21 जून रोजी पणजी, 22 रोजी साखळी, 28 रोजी धारबांदोडा तर 29 जून रोजी सकाळी मडगाव व सायंकाळी काणकोण येथे मेळावा होणार आहे.
कोकणीसोबतच मराठीलाही राजभाषा करावी यासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणला जात आहे. उत्तर गोव्यासोबत दक्षिण गोव्यातही आतापर्यंत झालेल्या मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे.